Enquiry
Dr. D. Y. Patil Vidyapeeth, Pune
(Deemed to be University)
Established under Section 3 of the UGC Act, 1956, vide NotificationNo. F.9-39/2001-U.3 dated
11th January 2003 of Government of India
Accredited (3rd Cycle) by NAAC with a CGPA of 3.64 on four point scale at ‘A++’ Grade

जागतिक मराठी अकादमीचे १८ वे जागतिक मराठी संमेलन

जागतिक मराठी अकादमीचे १८ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’ डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी येथे रसिकांच्या उदंड प्रतिसादात पार पडले. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, उद्योग, कृषी, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांत नाममुद्रा उमटवणारे परदेशास्थ मराठी आणि भारतीय मान्यवर सहभागी झाले.

संमेलनाचे उद्घाटन पद्मविभूषण मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते झाले. यावेळी मा. सुशीलकुमारजी शिंदे, मा. डॉ. पी. डी. पाटील – संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी – पुणे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष मा. रामदास फुटाणे, तसेच मा. भाई जयंत पाटील, मा. हितेन्द्र ठाकूर, मा. नागराज मंजुळे, मा. अरुण फिरोदिया, मा. हणमंतराव गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मा. डॉ. प्रमोद चौधरी यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना जागतिक मराठी गौरव पुरस्कार देण्यात आला.
५ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान झालेल्या या संमेलनात विविध परिसंवाद झाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही व्यंग, वास्तव आणि राजकारण या परिसंवादात सहभाग घेतला.